|| पगाराची आरती ||
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव, जय देव !
महिन्याच्या पहिल्या, आठवड्याला येशी,
सकलांना सुख आणि आनंद देशी,
काटकसर केली तरी, कमी पडशी,
शेवटच्या आठवड्यात, संपून जाशी..
जय देव, जय देव ! -1
असशी तू तुटपुंजा, घरी ना पटते,
रोज सौ. माझ्याशी, भांडत असते,
तुझ्या हिशोबातच, नोकरी सरते,
मुला-बाळांची, काळजी वाटते.
जय देव ! जय देव ! -2
तुझ्या सवे कधी, ओव्हर टाईम येतो,
दसरा, दिवाळीला, बोनस नसतो,
महागाईत थोडा, दिलासा मिळतो,
कर्जाचा डोंगर, जरासा हालतो..
जय देव ! जय देव ! -3
महागाई बरोबर, तुझी शर्यत,
कुर्मगती तुझी रे, नाही जिंकत,
हव्यासे काही जण, भ्रष्टाचारात,
सांग कुठे कशी, राहिल नियत ?
जय देव ! जय देव ! -4
मागणे इतुकेच, तुजला पगारा !
महिन्याला भेटावे, तुच आसरा,
आणखी विनवितो, तुला रे जरा,
पुरून उरावा तू, आमुच्या संसारा,
जय देव ! जय देव ! -5
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव ! जय देव !
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव, जय देव !
महिन्याच्या पहिल्या, आठवड्याला येशी,
सकलांना सुख आणि आनंद देशी,
काटकसर केली तरी, कमी पडशी,
शेवटच्या आठवड्यात, संपून जाशी..
जय देव, जय देव ! -1
असशी तू तुटपुंजा, घरी ना पटते,
रोज सौ. माझ्याशी, भांडत असते,
तुझ्या हिशोबातच, नोकरी सरते,
मुला-बाळांची, काळजी वाटते.
जय देव ! जय देव ! -2
तुझ्या सवे कधी, ओव्हर टाईम येतो,
दसरा, दिवाळीला, बोनस नसतो,
महागाईत थोडा, दिलासा मिळतो,
कर्जाचा डोंगर, जरासा हालतो..
जय देव ! जय देव ! -3
महागाई बरोबर, तुझी शर्यत,
कुर्मगती तुझी रे, नाही जिंकत,
हव्यासे काही जण, भ्रष्टाचारात,
सांग कुठे कशी, राहिल नियत ?
जय देव ! जय देव ! -4
मागणे इतुकेच, तुजला पगारा !
महिन्याला भेटावे, तुच आसरा,
आणखी विनवितो, तुला रे जरा,
पुरून उरावा तू, आमुच्या संसारा,
जय देव ! जय देव ! -5
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव ! जय देव !
No comments:
Post a Comment