७५% भागिदारी बायकोची .....
नवरा बायको सुरू करतात नवा नवा संसार
दहा वीस वर्ष जातात त्यातील कळायला सार
नवऱ्यालाही येते कल्पना बायकोच्या महतीची
म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची
कसे जोखमीचे ते नऊ महिने बायको जाते जगून
नवऱ्याच्या घराण्याचा वंशाचा दिवा वाढावा म्हणून
नवऱ्याला कल्पना तरी आहे का त्या अवस्थेची?
म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची.
तीन-चार वर्ष बायकोची, जातात बाळाच्या शी शू ची
नवऱ्याने किती वेळा घातला यांत त्याचा वेळ खर्ची?
कामावरून बोललं कि नवऱ्याला का झोंबते मिरची?

किती वेळा नवरा येतो बाहेरूनच काही खाऊन
आणि घरी येऊन रागावतो भाजी अळणी म्हणून
करून दाखवावी नवऱ्याने साधी भाजी बटाट्याची

तक्रार, राग, करतानाही नवऱ्याचा जातो किती काळ
माहितीय का त्याला किती लागतं तेल आणि डाळ?
घरी करत नाही जास्त काही, तरी का मर्जी नवऱ्याची?

नोकरी करणारी असेल बायको तर हि गंमत पहा
कोणत्या तोंडाने मागतो नवरा आल्या आल्या चहा?
घर व नोकरी अशी दुप्पट सेवा किती आहे महत्वाची?

नवराही खरंच खपतो करून मेहनत नोकरी धंदा
पण घरचं व्यवस्थापन नसेल तर होतो मोठा वांदा
करा कल्पना बायकोशिवाय सहल, सणावाराची

नवरा काय करतो, ते बायकोने दाखवलय करून
नवऱ्यानेही द्यावं आता आपलं कसब दाखवून
चार चाकाच्या गाडीचीही, फिरतात दोन मागची

स्त्री-पुरूष समानतेच्या राहिल्यात नुसत्याच गप्पा
बायको जरा काही बोलली तर नवरा होतो खप्पा
बायको या संस्थेची कुठे आहे नवीन उंची??
म्हणून वाटतं, संसारात ७५% भागिदारी बायकोची !!

No comments:
Post a Comment