" संदुक आणि वळकटी "
----------------------------------------------
बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला
एकदम माझ्या मित्राचा
चेहरा पांढरा पडला 😨
तो म्हणाला दिवाळी आली की
हल्ली धड धड होतं
जुनं सारं वैभव आठवून
रडकुंडीला येतं 😢
चार दिवसाच्या सुट्टीत आता
कसं होईल माझं
एवढ्या मोठ्या वेळेचं
उचलेल का ओझं ? 😳
मी म्हटलं अरे वेड्या
असं काय म्हणतोस
सलग सुट्टी मिळून सुद्धा
का बरं कण्हतोस ?🤒
काय सांगू मित्रा आम्ही
चौघ बहीण भाऊ 👨👩👧👦
कुणीच कुणाला बोलत नाही
मी कुठे जाऊ ?🚶🏻
आता कुणी कुणाकडे
जात येत नाही
आम्हालाही दोन दिवस
कुणीच बोलावीत नाही 😷
चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो
लहानपणीचे फोटो पाहून
मी एकटाच रडतो 🙇🏻
पूर्वीच्या काळी नातेवाईक
बरेच गरीब होते
तरीही ते एकमेकाकडे
जात येत होते 🏃🏻💃🏻
कुणाकडे गेल्या नंतर
आतून स्वागत व्हायचं
सारं काम साऱ्यानी
मिळून मिसळून करायचं 🙋🏻♂
सुबत्ता फार नव्हती
पण वृत्ती चांगली होती
गरिबी असून सुद्धा
खूप मजा होती 🤗
मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा भेटायचा
त्याप्रसंगी आनंद मात्र
आभाळा एवढा असायचा 😝
लाल,हिरव्या रंगाचे
वासाचे तेल असायचे
अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
बुडाला जाऊन बसायचे 🤔
उत्साह आणि आनंद मात्र
काठोकाठ असायचा
सख्खे असो चुलत असो
वाडा गच्च दिसायचा 👨👩👧👦👩👩👧👦👨👨👧👦
चपला नव्हत्या बूट नव्हते
नव्हते कपडे धड
तरीही जगण्याची
मोठी धडपड 👡👞👕👚
सारे झालेत श्रीमंत
पण वाडे गेले पडून
नाते गोते प्रेम माया
विमानात गेले उडून ✈
घरा घरात दिसतो आता
सुबत्तेचा पूर 🌉
तरी आहे मना मनात
चुली सारखा धूर 💨
पाहुण्यांचे येणे जाणे
आता संपून गेले
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण गेले 🙅🏻🙅🏻♂
श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
मोठे सण असतात
फ्लॅट आणि बंगल्या मधे
दोन चार माणसं दिसतात 🏢
प्रवासाची सुटकेस आता
अडगळीला पडली 👜
त्या दिवशी माझ्याजवळ
धाय मोकलून रडली 😭
हँडल तुटलं होतं तरी
सुतळी बांधली होती
लहानपणी तुमची मला
खूप सोबत होती 🎒
सुटकेस म्हणली सर मला
पाहुण्याकडे नेत जा
कमीत कमी दिवाळीत तरी
माझा वापर करीत जा 💼
सुटकेसचं बोलणं ऐकूण
माझं ही काळीज तुटलं
म्हणलं बाई माणसाचं
आता नशीब फुटलं 😥
म्हणून म्हणतो बाबांनो
अहंकार सोडा
बहीण भाऊ काका काकू
पुन्हा नाती जोडा
👨🏻👩🏻👱🏻♀👱🏻👴🏻👵🏻👶🏻👦🏻👧🏻👳🏻♀🙋🏻♂
' संदुक ' आणि ' वळकटीचे '
स्मरण आपण करू
दिवाळीला जाण्यासाठी
पुन्हा सुटकेस भरु🚊💼👜
🙏🏻💃🏻🙏🏻💃🏻🙏🏻💃🏻🙏🏻
----------------------------------------------
बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला
एकदम माझ्या मित्राचा
चेहरा पांढरा पडला 😨
तो म्हणाला दिवाळी आली की
हल्ली धड धड होतं
जुनं सारं वैभव आठवून
रडकुंडीला येतं 😢
चार दिवसाच्या सुट्टीत आता
कसं होईल माझं
एवढ्या मोठ्या वेळेचं
उचलेल का ओझं ? 😳
मी म्हटलं अरे वेड्या
असं काय म्हणतोस
सलग सुट्टी मिळून सुद्धा
का बरं कण्हतोस ?🤒
काय सांगू मित्रा आम्ही
चौघ बहीण भाऊ 👨👩👧👦
कुणीच कुणाला बोलत नाही
मी कुठे जाऊ ?🚶🏻
आता कुणी कुणाकडे
जात येत नाही
आम्हालाही दोन दिवस
कुणीच बोलावीत नाही 😷
चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो
लहानपणीचे फोटो पाहून
मी एकटाच रडतो 🙇🏻
पूर्वीच्या काळी नातेवाईक
बरेच गरीब होते
तरीही ते एकमेकाकडे
जात येत होते 🏃🏻💃🏻
कुणाकडे गेल्या नंतर
आतून स्वागत व्हायचं
सारं काम साऱ्यानी
मिळून मिसळून करायचं 🙋🏻♂
सुबत्ता फार नव्हती
पण वृत्ती चांगली होती
गरिबी असून सुद्धा
खूप मजा होती 🤗
मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा भेटायचा
त्याप्रसंगी आनंद मात्र
आभाळा एवढा असायचा 😝
लाल,हिरव्या रंगाचे
वासाचे तेल असायचे
अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
बुडाला जाऊन बसायचे 🤔
उत्साह आणि आनंद मात्र
काठोकाठ असायचा
सख्खे असो चुलत असो
वाडा गच्च दिसायचा 👨👩👧👦👩👩👧👦👨👨👧👦
चपला नव्हत्या बूट नव्हते
नव्हते कपडे धड
तरीही जगण्याची
मोठी धडपड 👡👞👕👚
सारे झालेत श्रीमंत
पण वाडे गेले पडून
नाते गोते प्रेम माया
विमानात गेले उडून ✈
घरा घरात दिसतो आता
सुबत्तेचा पूर 🌉
तरी आहे मना मनात
चुली सारखा धूर 💨
पाहुण्यांचे येणे जाणे
आता संपून गेले
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण गेले 🙅🏻🙅🏻♂
श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
मोठे सण असतात
फ्लॅट आणि बंगल्या मधे
दोन चार माणसं दिसतात 🏢
प्रवासाची सुटकेस आता
अडगळीला पडली 👜
त्या दिवशी माझ्याजवळ
धाय मोकलून रडली 😭
हँडल तुटलं होतं तरी
सुतळी बांधली होती
लहानपणी तुमची मला
खूप सोबत होती 🎒
सुटकेस म्हणली सर मला
पाहुण्याकडे नेत जा
कमीत कमी दिवाळीत तरी
माझा वापर करीत जा 💼
सुटकेसचं बोलणं ऐकूण
माझं ही काळीज तुटलं
म्हणलं बाई माणसाचं
आता नशीब फुटलं 😥
म्हणून म्हणतो बाबांनो
अहंकार सोडा
बहीण भाऊ काका काकू
पुन्हा नाती जोडा
👨🏻👩🏻👱🏻♀👱🏻👴🏻👵🏻👶🏻👦🏻👧🏻👳🏻♀🙋🏻♂
' संदुक ' आणि ' वळकटीचे '
स्मरण आपण करू
दिवाळीला जाण्यासाठी
पुन्हा सुटकेस भरु🚊💼👜
🙏🏻💃🏻🙏🏻💃🏻🙏🏻💃🏻🙏🏻
No comments:
Post a Comment