बाळाला जन्म दिल्यावर..
प्रत्येकजण विचारतो ,"मुलगा की मुलगी?"
फक्त आईच विचारते, "माझं बाळ कसं आहे?"
तिला प्रश्न पडत नाही, "मुलगा की मुलगी?" म्हणून तर ती आई असते ..
परवा एक मित्र भेटला..
खूप दिवसांनी.. मी सहजच विचारलं - "आई कशी आहे रे?"
शांतं झाला थोड्यावेळ आणि म्हणाला - गेली दोन वर्ष वृद्धाश्रमात आहे..
आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला."
त्यानं मला विचारलं - "तुझी आई तुझ्याकडेच असते ना?"
मी म्हणालो - मी आईपेक्षा मोठा नाही झालो. आई माझ्याकडे नसते.
मीच आईकडे राहतोय.
....जन्मापासून"..
आवडल कि नक्की पुढे पाठवा.
No comments:
Post a Comment