Saturday, March 26, 2016

एकदा एका सॉफ्टवेअर इंजिनीयरने पाहिले की एक बैल गाडी ओढतो आहे व शेतकरी त्या गाडीत शांतपणे झोपला आहे.
हे दृष्य पाहून त्याला फार आश्चर्य वाटले व तो शेतकर्‍याला म्हणाला,
“जर बैल थांबला तर तुम्हाला समजणारही नाही”
 
शेतकरी : समजेल साहेब, बैल चालायचा थांबला तर त्याच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज येणार नाही.
यावर इंजिनीयर एक मिनिट विचार करून म्हणाला, “पण जर हा बैल एका जागी थांबून फक्त मान हलवत राहिला तर?
 
शेतकर्‍याने शांतपणे उत्तर दिले : “आमचा बैल IT मधे काम करत नाही साहेब!”
😂😂😂

No comments:

Post a Comment