तंत्रामुळे अंतर संपलं, बोटावरती कोस!
वाॅटसॅपवरती क्षणात भेट, कट्टे पडले ओस!
रोजरोज ताजा फोटो, अक्षरातून बोलतात!
प्लॅस्टीकचिच फुलं आता, पंखा लावताच डोलतात!
डोळे भरुन बघणं नाही, नाही गळामिठी!
आसवांमधे भिजत नाही, प्राणओली चिठी!
स्पर्श फक्त बटनांचा, नि पडद्यावरतीच भेट!
कुरीअरने घरपोच वस्तू, ओसाड बाजारपेठ!
मऊमऊ कापसाखाली, काहीतरी चुरतंय!
बंगल्यामधलं पाखरु आता, घरट्यासाठी झुरतंय!
मोकळ्या पडल्या कट्टावरती, वासना लुटते भूक!
मित्रांजागी अक्षर भेटतं, शब्द झालेत मूक!
भिंतीवरची तसबीर पडली, उरला फक्त खिळा!
अश्रू कोण पुसणार आता? पापण्यांमधेच गिळा!

No comments:
Post a Comment