Tuesday, December 29, 2015

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....
अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरूवात करतो......
अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया, पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....
थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....

आयुष्याचेदेखील असेच आहे का ?? ?
पाटीभर आनंद शेजारी असूनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....

पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते.....

आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...

💐 good morning 🌷🌸💐

No comments:

Post a Comment