Saturday, January 31, 2015

एक कविता….आज पुन्हा पगार होणार.....😳😳

आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........


मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........


चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........


पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........


१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू👼 होणार,
काय रे देवा...........


अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग”🐠🐟 झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........


२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर☕ दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........

 😳
३1 तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार......

😰काय रे देवा..........

No comments:

Post a Comment