Sunday, December 13, 2015

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो,
ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,👳🏽
त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो,
ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,🙇🏻
हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो,
चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो 🍇🍒
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

🍩यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,🌊
ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो🌰
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

🏊धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,👰🏻
नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,💃🏻
तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो 👩🏻
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,👦🏻
आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,🐃 🐐
बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,😳
मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,😔
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,📃
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,😳📃
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,😉
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,😷
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,🍮
रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,🌾🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌾
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,🚶🏻
मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,😢
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,👮🏻🙏🏻
कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,👌🏻
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,👩🏻💧
आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,😍
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘
................
😍😍आवडल तर पुढे पाठवा😍😍

No comments:

Post a Comment